ग्रामपंचायत कार्यालय हे गावविकासाचे केंद्रबिंदू ठरावे : रवि शिंदे

घोटनिंबाळा ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन
शिवसेनेचे भद्रावती तालुका प्रमुख भास्कर ताजने यांच्या वाढदिवसी उपक्रम

भद्रावती : शिवसेनेचे भद्रावती तालुका प्रमुख भास्कर ताजने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधुन आज (दि.१) ला घोटनिंबाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे रवि शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालय हे गावविकासाचे केंद्रबिंदू ठरावे, गावक-यांच्या समस्या या कार्यालयातून मार्गी लागाव्या, असे मत रवि शिंदे यांनी यावेळी मांडले.भास्कर ताजने यांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा देवून त्यांच्या ग्रामीण भागातील कार्याचे कौतूक करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख भास्कर ताजणे, सुनिल मोरे, ग्रामसचिव अश्विन पेटकर, सरपंच देवेंद्र रामटेके, उपसरपंच प्रदिप नन्नावरे, ग्रा. पं. सदस्य लता दुधकोहळे, निर्मला विलास थेरे, अनिल नेहारे, आकाश ढवस, कैलाश दुधकोहळे, विनोद सोनटक्के, अजय जांभुळे व गावकरी उपस्थित होते.