प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देवराव भोंगळे यांच्या हस्ते धान्य वाटप

घुग्घूस : शनिवार 2 ऑक्टोबर रोजी घुग्घुस येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गोर गरीबांसाठी धान्याची महत्वकांक्षी योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशामध्ये गोर गरीब व्यक्तींना प्रति माह 5 किलो गहू, तांदूळ देण्याची योजना सुरु आहे. ही योजना देशामध्ये जुलै 2021 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत पाच महिने गोर गरिबांना मिळत आहे. कोरोना संकटात गोर गरीब नागरिक घरात होते अश्या वेळी गोर गरिबांना आधार देण्याकरिता गरिबांची गरज पूर्ण करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 3 लाख 99 हजार कार्ड धारक आहे याचे 18 लाख लाभार्थी होतात यांना प्रति माह 5 किलो गहू, तांदूळ धान्याचा लाभ मिळणार आहे.
आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पर्वावर देशात व जिल्ह्याभर भाजपाचे कार्यकर्ते सरकारी स्वस्त धान्य दुकानात जाऊन या योजनेची माहिती गोर गरिबांना देत आहे.

यावेळी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, चंद्रपूर भाजपाचे सचिव धर्मेंद्र पंडित, भाजपाचे जेष्ठ नेते संजय तिवारी, माजी उपसभापती पं.स. निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्या वैशाली ढवस, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहने, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, भाजपाचे शाम आगदारी, अजय आमटे, भारत साळवे, रज्जाक शेख, तुलसीदास ढवस, गुड्डू तिवारी, शरद गेडाम उपस्थित होते.