152 वी गांधी जयंती निमित्त नगरपरिषदे तर्फे पर्यावरण रक्षणार्थ सायकल रॅली व वृक्षारोपण

स्वच्छता कर्मीचे शाल श्रीफळ देऊन सत्कार 

घुग्घुस : 2 ऑक्टोबर गांधी जयंती दीना निमित्त घुग्घुस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ.आर्शिया जुही यांच्या मार्गदर्शना खाली स्वच्छता सर्वक्षण सप्तपदी स्वच्छतेची कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात घुग्घुस पोलीस स्टेशन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री प्रतिमेस मा.ठाणेदार राहुल गांगुर्डे, मुख्याधिकारी आर्शिया जुही, काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या हस्ते मालार्पण व पुष्क अर्पण करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून शहरात प्रामाणिकपणे स्वच्छता करून शहर निरोगी ठेवण्यास हातभार लावणाऱ्या महिला स्वच्छता कर्मी लक्ष्मी येरला व बट्टू भाई
यांचे ठाणेदार राहुल गांगुर्डे व राजूरेड्डी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व नगद राशी देऊन सन्मान करण्यात आला.

यानंतर पोलीस स्टेशन येथून कबीर पेट्रोल पंपा पर्यंत सायकल रैली काढण्यात आली. यामध्ये सर्व नगरपरिषद कर्मचारी विविध राजकीय संघटना, व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते चंद्रपूर हायावे मार्गाच्या बाजूने वृक्षारोपण करण्यात आले.

घुग्घुस शहरात प्रथमच घेण्यात आलेल्या या अभिनव कार्यक्रमाची शहरात सकारात्मक चर्चा आहे याप्रसंगी नगरपरिषदेचे अभियंता अमर लाड, विक्रम क्षीरसागर, अभिषेक जांबुळे, नगरपरिषदेचे कर्मचारी विठोबा झाडे, सुरज जंगम, हरीदास जोगी, शंकर पचारे, संदीप मत्ते, मोसम कुरेशी, रवींद्र गोहोकर, खुशाल घागरगुंडे, सुप्रिया खोब्रागडे, स्नेहल बहादे, अशोक रसाळ, सुरेश येरगुराला,व अन्य कर्मचारी उपस्थित होते.