खासदार बाळु धानोरकर यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांची काँग्रेस पक्षात प्रवेश

चंद्रपूर : घुग्घुस शहरात काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येणाऱ्या जनसेवेच्या कार्याकडे सर्व सामान्य नागरिकांसह अन्य पक्षातील नेत्यांचा कल वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी घुग्घुस भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते निरंजन डंभारे व युवा नेते केतन वझे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

आज 02 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या हस्ते शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे नेते अलीम शेख, नईम शेख(भैय्या भाई) सईद शेख(सैदू भाई) मोसीम शेख,यांनी प्रवेश केला.

यासोबतच नुरुल सिद्दिकी, जुबेर शेख, यांनी ही अधिकृतरित्या काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार बाळु धानोरकर यांनी काँग्रेस पक्षाचे दुप्पटे टाकून कार्यकर्त्यांचा प्रवेश घेतला व काँग्रेस पक्षात सर्वांचे स्वागत केले.

काँग्रेस पक्षच देशातील सर्व धर्मांच्या जाती – पातीच्या सर्व घटकातील लोकांना न्याय देऊ शकतो म्हणून जास्तीत जास्त युवकांनी लोकशाही रक्षणासाठी काँग्रेस पक्षाचे हात बळकट करावे असे आवाहन खासदारानी केले. याप्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, प्रदेश सचिव विनोद दत्तात्रेय,कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दंतलवार, सुनील पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.