ठाणेदार सत्यजित आमले यांनी महामार्गावरील खड्डे बुजवण्याचा स्तुत्य उपक्रम घेतला हाती

कोरपना : चंद्रपूर ते आदीलाबाद या राज्य महामार्गावर दिवसेंदिवस खड्ड्याचे प्रमाण वाढत जात असून त्यामुळे वाहनधारकांना कमालीची कसरत करावी लागत आहे शिवाय या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढत आहे एवढेच नव्हे तर लहान वाहनधारकांना दुचाकीस्वारांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे विशेष करून रात्रीच्या वेळेला दृष्टीला पडत नाही दिवसाच्या वेळेला त्यामध्ये पाणी साचलेले असते वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

या सर्व समस्यांची दखल घेत गडचांदूर पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष ठाणेदार सत्यजित आमले यांनी आपल्या चिकित्सक विचारातून गडचांदूर ते फुटला फाटा व गडचांदूर ते धामणगाव फाटा या परिसरात शिवाय नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या राज्य महामार्गाच्या परिसरामध्ये असलेले खड्डे बुजवण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून तिचे अनुकरण मध्ये असलेले राजकीय नेते पदाधिकारी स्वयंसेवी संस्था यांनी सुद्धा करावे असे आव्हान त्यांनी केलेले आहे या उपक्रमात ठाणेदार सत्यजित आमले समवेत धर्मराज मुंडे पोलीस वाहतूक शिपाई व्यंकटेश भट्ट लाडे यांनी सुद्धा सहभाग दर्शविला.