फडणवीस सरकारच्या काळात लावलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीची आता चौकशी होणार

0
343
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील 33 कोटी वृक्ष लागवडीची आता चौकशी होणार असून, वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी ही माहिती विधानसभेत दिली. राज्यात फडणवीस सरकारच्या काळात 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली त्याबाबत सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी वृक्ष लागवडीची चौकशी करण्यासाठी कमिटी नेमणार का? तसेच देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट्स यशस्वी झालं का? असा सवाल उपस्थित केला आहे. यावर उत्तर देताना वन राज्य मंत्र्यांनी विधिमंडळ समिती नेमली जाणार असे सांगितले.

या समिती मार्फत 33 कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत खासगी संस्थेने केलेल्या आर्थिक योगदानाची माहिती तपासली जाईल. तसेच राज्य सरकारकडून किती पैसे खर्च करण्यात आले आणि वृक्ष लागवडीनंतर किती जागे जगली याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती वनराज्य मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत दिली.

३१ मार्च पर्यंत समिती होणार स्थापन : वृक्ष लागवडी संदर्भात समिती किती दिवसात गठीत होईल, आणि त्याचा अहवाल किती दिवसात येईल? असा सवाल मुनगंटीवार यांना केला होता. त्यावर 31मार्च 2021 पर्यंत समिती स्थापन करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ही समिती पुढील 4 महिने चौैकशी करेल. त्या कालावधीत त्यांना माहिती मिळण्य़ास अधिकचा वेळ म्हणून २ महिने वाढवून देण्यात येतील अशा प्रकारे ६ महिन्यात ती समिती अहवाल सादर करेल, अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.