मोठ्या भावाचा लहान भावावर धारधार शस्त्राने हल्ला

0
450

• दारूच्या नशेत तर्रर्र होता मोठा भाऊ

चंद्रपूर : घुग्घुस शहरातील विठ्ठल मंदिर वार्डात मोठ्या भावाने लहान भावावर धारधार शस्त्राने हल्ला. यात लहान भाऊ जखमी झाला आहे. या प्रकरणात लहान भावाने पोलीसात तक्रार केली असून मोठाभाऊ रवी सुधाकर बिडवाईक (28)याचेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपी मोठ्या भावाला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन घरी लहान भावाला शिवीगाळ करायचा. काल मंगळवारी (2 मार्च) ला आरोपी भाऊ दारू पिऊन घरी आला. आणि लहान 24 वर्षीय भाऊ कुणाल बिडवाईक याला शिवीगाळ करू लागला. लहान भावाने शिवीगाळ करण्यापासून रोखले असता संतापलेल्या आरोपी भावाने धारधार शस्त्राने हल्ला करून जखमी केले.

घुग्घुस पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवित 324, 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.