चंद्रपुरात पैशाच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

0
786
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
• स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला केली अटक
• बाबुपेठ परिसरातील विक्तूबाबा मठाजवळील घटना

चंद्रपूर : शहरात विक्तुबाबा मठाजवळ पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना काल मंगळवारी (२ मार्च) ला रात्री साडेनऊच्या नऊच्या सुमारास घडली आहे. सोनू राजेश चांदेकर असे मृत युवकाचे नाव असून तो बाबुपेठ येथील निवासी आहे. आज आरोपी पवन पाटील याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मृत आणि आरोपी दोघेही मित्र आहेत.

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ निवासी मृत सोनू चांदेकर आणि आरोपी पवन पाटील हे दोघेही मित्र आहेत. बाबुपेठ परिसरातील विक्तूबाबा मठाजवळ काल रात्री साडेनऊच्या सुमारास लोकांची चहलपहल सुरूच होती. दरम्यान या चौकातच उपस्थित असलेल्या दोघां मित्रात पैसाच्या कारणावरून भांडण झाले. भांडण इतके वाढले की, भांडणाचे पर्यावसान हत्येत झाले. आरोपी पवन पाटीलने सोनूच्या पोटात चाकू खुपसून हत्या केली. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्याला मारण्यात आले, हे त्या ठिकाणी असलेल्या प्रत्यदर्शींना समजले नाही.
धारार्तिर्थ पडलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर अज्ञात आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. लगेच घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली.

ठाणेदार रोशन यादव आपल्या चमुसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला पाठविला. आज बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील आरोपी पवन पाटील याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपीने पन्नास रूपयासाठी मारल्याचे सांगितल्या जात आहे. रामनगर पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच हत्येमागचे कारण पुढे येणार आहे.