प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सन्मान करा : खासदार बाळू धानोरकर

0
60

चंद्रपूर : सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी गोरगरीब जनता, शेतकरी तसेच इतर सर्वसामान्य लोकांना शासकीय काम असो अथवा इतर कोणत्याही कामला त्रास होता काम नये अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ते पोंभूर्णा येथील कार्यकर्ते अधिकारी यांच्या बैठकीत बोलत होते. या तालुक्यात काँग्रेसने २७ पैकी ११ ग्रामपंचायतीमध्ये सत्ता काबीज केली. येत्या काळात या तालुक्यात मोठ्या प्रमाणात संघटन वाढीच्या कार्यक्रम आखून घर घरात व मना मनात काँग्रेस नेण्याचे कार्य करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

यावेळी तहसीलदार निलेश खटके, वीजवितरण विभागाचे अधिकारी श्री पाटील, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. टांगले, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेसचे जेष्ठ नेते घनश्याम मुलचंदानी, तालुका अध्यक्ष कवडूजी कुंदावार, गटनेते आतिफ कुरेशी, नगरसेवक जयपाल गेडाम, साईनाथ शिंदे, पराग मूलकरवार, ओमेश्वर पदमगिरवार, रवी मालपल्लीवार, प्रशांत झाडे, आनंदराव पातडे यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनांच्या प्रत्येक योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे व शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. याकरिता उपाययोजना करण्याचे सांगितले. तसेच गरीब शेतकऱ्यांच्या नावावर दुसल्याला लाभ घेता येणार नाही, याची दक्षता घेण्याचे सांगितले. तसेच विजवितरण कंपनीच्या अधिकारी याना शेतकरी पासून तर सर्वसामान्य जनतेचे वीज कनेक्शन कोणत्याही परिस्थितीत कापण्यात येऊ नये, ज्यांचे बिल जास्त आहेत त्यांना टप्पे पडून घ्या व वीजबिल भरणा करून घ्या. परंतु वीज कापण्यास सक्त मनाई केली आहे. व तशा सूचना यावेळी देण्यात आल्या. कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता तालुक्यातील सर्व जनतेने मास्क व सॅनिटायझरचा वापर करून कोरोना पासून बचाव करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. गोरगरीब जनता, शेतकरी तसेच इतर सर्वसामान्य लोकांना शासकीय काम असो अथवा इतर कोणत्याही कमला त्रास होता काम नये अन्यथा मी शांत बसणार नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here