हायकोर्टाचे वकील दाम्पत्याच्या दुहेरी हत्या प्रकरणात तेलंगणा पोलिसांकडून वणीत ‘सर्चिंग ऑपरेशन’ ; माजी आमदारांचा शोध

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
तीन महिन्यांपूर्वी 17 मार्च बुधवार रोजी पेद्दापल्ली जिल्ह्यातील मंथनी येथे भर रस्त्यावर हायकोर्टाचे वकील गट्टू वामनराव आणि त्यांच्या पत्नी नागमणी दाम्पत्याची हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणात पुट्टा मधुकर हा आरोपी आहे. त्याचा पुतण्या बिट्टू श्रीनिवास याला पोलिसांना अगोदरच अटक केली आहे.

वणी (यवतमाळ) : तेलंगणा राज्यातील मंथानी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व पेद्दापल्ली जिल्हा परिषदचे अध्यक्ष पुट्टा मधू हे गंभीर गुन्ह्यात फरार आहेत. मोबाईल लोकेशन वरून ते वणीत असल्याचे कळताच रविवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास तेलंगणा पोलीस वणीत धडकले. यवतमाळ मार्गावरील कोळसा व्यावसायिकांचे घरी व छोरीया लेआऊट परिसरातील एका सदनिकेत आरोपीच्या शोधार्थ “सर्च ऑपरेशन” केले.

तेलंगणा राज्यातील पेद्दापल्ली येथील पोलीस अधीक्षक आपल्या ताफ्यासह पहाटे वणीत पोहचले. 4 वाजताच्या सुमारास यवतमाळ मार्गावरील कोळसा व्यावसायिकांच्या घराची ‘डोअर बेल’ वाजवली मात्र साखर झोपेत असलेल्यानी दरवाजा उघडला नाही. त्यांनी तात्काळ वणी पोलिसांसोबत संपर्क साधला. 5 वाजता सर्च मोहिम राबवली. यावेळी छोरीया लेआऊट परिसरातील सदनिकेची तपासणी करण्यात आली. मात्र दोन्ही ठिकाणी गंभीर गुन्ह्यात हवा असलेला माजी आमदार तसेच विद्यमान जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पुट्टा मधू आढळून आला नाही.

तेलंगणातील फरार पुट्टा मधू यांचे येथील एका कोळसा व्यवसायीका सोबत घनिष्ठ संबंध आहेत त्यातच मोबाईल लोकेशन येथील शेवाळकर परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले होते. तर शनिवारी फरार आरोपी वणीतच असल्याचे सर्च ऑपरेशन दरम्यान सांगण्यात आले आहे. तेलंगणा पोलिसांनी बराच वेळ आरोपीचा शोध घेतला. यावेळी करण्यात आलेल्या सर्च मोहिमेत तेलंगणा राज्यातील पोलीस अधीक्षक, एक सर्कल इन्स्पेक्टर, चार पोलीस निरीक्षक यांचा समावेश होता तर 20 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.