घुग्घुस येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ अभियान बुथ समितीचा जिल्हास्तरीय उदघाटन समारंभ संपन्न

घुग्घुस : रविवार 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता घुग्घुस येथील प्रयास सभागृहात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ अभियान बुथ समिती विधानसभा 71 चंद्रपूर बुथ क्र.350 चा उदघाटन समारंभ संपन्न झाला.

या समारंभाचे उदघाटन माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेसमोर द्विप प्रज्वलीत व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुछ देऊन करण्यात आले. याप्रसंगी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व समर्थ बुथ अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या.

मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, माजी जिप सभापती सौ. नितुताई चौधरी, नकोडा सरपंच श्री. किरण बांदूरकर, माजी पस. उपसभापती निरीक्षण तांड्रा, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, उत्तर भारतीय मोर्चाचे संजय तिवारी, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर मालेकर, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, पुजा दुर्गम, सुचिता लुटे, वैशाली धवस भाजपा नेते संजय भोंगळे उपस्थित होते.

घुग्घुस शहरात 28 बुथ असून बुथवर एका बुथ प्रमुख मागे 30 कार्यकर्ते देण्यात येणार आहे. यात महिला, बचत गट महिला, जेष्ठ नागरिक, युवक, सर्वसमावेशक असे सर्व जातीचे धर्माच्या लोकांना समाविष्ट करण्यात येणार आहे. बुथ रचना मजबूत करणे, “मेरा बुथ सबसे मजबूत” व भारतीय जनता पार्टीचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी दिनांक 9,10,11,12 या चार दिवसात अभियान राबविण्यात येणार आहे.

घुग्घुस येथील गंधर्व मेडिकलचे संचालक गंधर्व भगत यांनी भाजपात प्रवेश घेतला त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आले. संचालन साजन गोहणे यांनी केले.

यावेळी माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा, भाजयुमोचे अमोल थेरे, उत्तर भारतीय मोर्चाचे रत्नेश सिंग, भाजपा नेते, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, वढा माजी सरपंच विलास भगत, जेष्ठ नागरिक संघाचे सचिव नीलकंठ नांदे, जनार्धन देवतळे, गुड्डू तिवारी, सुरेंद्र भोंगळे, तुलसीदास ढवस, रवी चुने, नितीन काळे, धनराज पारखी, विनोद जंजर्ला, स्वामी जंगम, मानस सिंग, गणेश खुटेमाटे, असगर खान, मंगेश पचारे, सतीश कामतवार, शंकर सिद्दम, जयराज घोरपडे, ललित होकम, मधुकर धांडे, रज्जाक शेख, भारत साळवे, संकेत बोढे, मंगेश जांभुळकर, कोमल ठाकरे, सुशील डांगे प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ. किरणताई बोढे, पुष्पा रामटेके, वीणा घोरपडे, अर्चना लेंडे, पुजा आवळे, लक्ष्मी वासाडे, सुमित्रा सावे, प्रिया करकाडे, शोभा सायखेडे, ज्योती काळे, शोभा चिंचोलकर, चंद्रकला मन्ने, शुभांगी मन्ने, काजल चांदेकर, भरती गायकवाड, प्रभा गिरडकर उपस्थित होते.