मुख्याध्यापिका सौ शुभांगीनी वैरागडे यांना निरोप

मुल : स्थानिक नवभारत कन्या विद्यालय मूलच्या मुख्याध्यापिका शुभांगीनी अनिल वैरागडे यांनी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्याने, त्यांच्या निरोप व सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अॅड. अनिल वैरागडे होते.
शाळेच्या वतीने वैरागडे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींच्या वतीनेही भेटवस्तू देण्यात आली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून म्हणून प्रभारी मुख्याध्यापिका मंगला सुंकरवार, ज्येष्ठ शिक्षक सुधाकर पुराम, छत्रपती बारसागडे उपस्थित होते.
उपस्थित शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थिनी यांनी मुख्याध्यापिका वैरागडे यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. कुटुंब प्रमुखाप्रमाणे शाळेचे व्यवस्थापन केल्याबद्दल सर्वांनी सौ. वैरागडे यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संचालन दिनेश जिड्डीवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रफ्फुल निमगडे यांनी केले.