Breaking : WCL पैनगंगा खाणीत अज्ञात युवकांनी चालकाला मारहाण करीत ट्रक पेटविले

कोळसा खाणीच्या इतिहासातील पहिली घटना

घुग्घुस : वेकोलीच्या मिनिरत्न दर्जा प्राप्त पैनगंगा कोळसा खाणीत आज रविवार रात्री साडे नऊ वाजता खाणीतुन कोळसा भरून रेल्वे साईडिंग घुग्घुस कडे येत असलेल्या चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या MH 34 BG 0862 अठरा चाकी वाहनाला चार ते पांच अज्ञात आरोपीने कैलास नगर गेट परिसरात अडविले चालकाला खाली उतरवून मारहाण करीत पेट्रोल द्वारे ट्रॅक पेटवून दिल्याने कोळसा खाण परिसरात एकच खळबळ उडाली.

एखाद्या खाणीत धसून याप्रकारे ट्रक पेटविणे ही प्रथमच घटना असून आरोपींना कायद्याचा कुठलाच वचक शिल्लक राहिलेला नाही अशी प्रचिती येत आहे.

घटनेची खरी माहिती पोलीस तपासात समोर येईलच.