महात्मा गांधी जयंती लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

भद्रावती : स्थानिक विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने 2 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी डॉ. उत्तम घोसरे, प्रा.संगीता बांबोळे, प्रा.अमोल ठाकरे, डॉ. रमेश पारेलवार राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व स्पोर्टिंग क्लबचे विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या व्यक्तित्त्वावर प्रकाश टाकला. तरुणांनी या महामानवांच्या आचरणानुसार वागणूक ठेवावी असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ.रमेश पारेलवार यांनी केले.