सर्वत्र पांदण रस्ते निर्माण करण्याचे उद्दिष्ट

खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी मागणी

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात चंद्रपूर – वरोरा – राजुरा – बल्लारपूर – वणी व आर्णी विधानसभा क्षेत्र येतात. या भागात धान, कापूस, व सोयाबीन तसेच चना व गहू लागवड प्रामुख्याने केली जाते. मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना स्वतःचे शेतात ये – जा करण्यास, मालवाहतूक, बी- बियाणे इत्यादी साठी बैल बंडी व ट्रॅक्टर नेण्यास रस्तेच नाहीत. दुसऱ्याच्या शेतातून जाणे – येणे व अनेक ठिकाणी कंपाउंड असल्याने सातत्याने वादविवाद होत असतात. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी चंद्रपूर वणी, आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे सर सकट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पांदण रस्त्याची सोया करून देण्याची मागणी केली आहे.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सद्यस्थितीत वरोरा विधानसभेत भद्रावती व वरोरा या ठिकाणी पांदण रस्त्याचे जास्तीत जास्त ठिकाणी कामे केली असून शेतकरी बांधव आनंदित आहेत. याच धर्तीवर इतरही ठिकाणी हि पांदण रस्त्याची कामे व्हावीत म्हणून खासदार बाळू धानोरकर यांनी राज्य सरकारकडे साकडे घातले आहे.

ग्रामीण भागात पांदण रस्त्याची निकड लक्षात घेता व काही ठिकाणी कच्या रस्त्यामुळे शेतकरी बांधवांचे होणारे हाल टाळण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी २४ लाखांचे अंदाजपत्रक ज्यात अकुशल निधी ९ लाख, कुशल निधी ६ लाख तर ९ लाख रूपये रोहयो मार्फत उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली असून त्यात तात्विक मान्यता मिळाल्याचे व लवकरच या प्रस्तावास मंजुरी मिळणार असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले आहे.