स्वतंत्र पत्रकार धोनी चिकाटे यांचे निधन

0
281

चंद्रपूर : पत्रकार ते खाजगी नोकरदार अश्या विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविनारा वरोरा शहराचा “धोनी” आज आपल्यातून निघून गेला.
अवघ्या 30 वर्ष वय असलेला विनोद उर्फ धोनी चिकाटे वरोरा शहरात आपल्या आई-वडील, भाऊ व बहिणीसोबत राहत होता, घरचा मोठा मुलगा असल्याने घरच्यांसाठी कोणतेही काम करण्याची तयारी दर्शविणारा धोनी, वरोऱ्यातील स्थानिक वृत्त वाहिनीत काम करीत होता, अनेक वर्षे त्याने स्वतंत्र पत्रकार म्हणून स्वतःची चांगली ओळख निर्माण केली.

पुढे चालून त्याने वरोरा शहरातील नामवंत खाजगी हॉस्पिटलमध्ये काम केले, कोरोना सारख्या भयावह काळात सुद्धा त्याने अनेकांची मदत केली, हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना कोविड योद्धा म्हणून त्याने कोविड लस सुद्धा घेतली होती.
घरची जबाबदारी पार पाडत विनोदने कधीही कोणत्या कामाला नकार दिला नाही, तो नेहमीच तत्पर असायचा.
घरी काम असल्याने विनोदने 2 दिवसांची सुट्टी घेतली मात्र या कालावधीत तो कोरोनाने ग्रासला.
त्याची तब्येत अचानक खालावल्याने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात 3 एप्रिलला सकाळी 10 वाजता दाखल करण्यात आले होते, मात्र रात्री 10 वाजेदरम्यान त्याचा मृत्यू झाला. विनोदची यावेळी कोविड चाचणी करण्यात आली त्यामध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, व वरोरा शहरातील धोनी, सोनू आपल्यातून निघून गेला. विनोदच्या अचानक जाण्याने वरोरा शहरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.