काँग्रेसने नोंदविला योगी सरकारचा निषेध

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे शेतकरी नरसंहार

चंद्रपूर : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीच्या तिकुनिया भागात शेतकरी नरसंहार घडवून आणण्यात आला आहे. या सर्व घटनेला तेथील योगी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (ता. ४) दुपारी ३.३० वाजता गांधी चौकात मोदी सरकार आणि योगी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

या आंदोलनाचे नेतृत्व चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी आणि योगी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्री योगी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जुते, चपलांचा मार दिला. लखीमपूर खीरीच्या तिकुनिया भागात शेतकरी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करीत होते. मात्र, या आंदोलनात मोटारी घुसविण्यात आल्या. यामुळे काही शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली आहे. या शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना अडवून ताब्यात घेण्यात आले. या घटनेचासुद्धा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.

या आंदोलनात महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुनीताताई अग्रवाल, नगरसेविका संगीता भोयर, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रवीण पडवेकर, बापू अन्सारी, नेहा मेश्राम, सायली देठे, प्रसन्ना शिरवार, निहाल शेख, मोनू रामटेके, भालचंद्र दानव, मोहन डोंगरे, इस्सार शेख, गौस खान, प्रमित माहूरकर, प्रमोद बोरीकर, राहुल चौधरी, मोहम्मद इरफान शेख, सुलतान अशरफी शेख, अब्दुल अजीज शेख, नौशाद शेख, इरफान बाबा शेख, राहुल ताजने, कासिफ अली, शेखर तंगडपल्ली, सिनु गुडला, संदीप सिडाम, गणपत दिवसे, विजय मते, आशीष आडे, नीलेश पिंगे, नंदू वासाडे, गणपत कुडे, धीरज उरकुडे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.