शेतकरी दाम्पत्याचा शेततळ्यात बुडुन मृत्यु

कोरपना तालुक्यातील मांडवा येथील घटना

चंद्रपूर : शेतातून घरी परत येत असताना बंडीला जुंपलेल्या बैलांना शेततळ्यावर पाणी पाजत असताना बंडीवर बसून असलेले शेतकरी पती पत्नी या दोघांचा शेततळ्यात बुडुन मृत्यु झाल्याची ह्दद्रावक घटना आज सोमवारी (4 आॅक्टोबर 2021) ला दुपारी दोन वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील मांडवा येथे घडली. अनिल डाहुले (40),व पत्नी छाया अनिल डाहुले (35) असे मृतांची नावे असून ते कोरपना तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी होते.

कोरपना तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी शेतकरी पती पत्नी अनिल डाहुले (40),व छाया अनिल डाहुले (35) हे दोघेही बैलबंडी घेऊन सकाळी शेतावर काम करण्यासाठी गेले होते. शेतात काम केल्यानंतर दुपारच्या सुमारास ते घरी येण्यासाठी निघाले. परत येत असताना वाटेतच एक सार्वजनिक शेततळे आहे. बैलांना बराच वेळ होवून पाणी न पाजल्यामुळे अनिलने जुंपलेल्या बैलासह बंडी पाण्यात टाकली. शेततळ्यातील पाण्यात जाताच बैलांनी बंडीखोलगट भागात ओढत नेली. त्यामुळेबंडीवर बसलेलेशेतकरी दाम्पत्य पाण्यात बुडाले. तर दोन्ही बैल बंडीवरून सुटून पाण्यातून पोहत बाहेर पडले. तर पाण्यातील बंडीवरच शेतकरी दाम्पत्यालाचा मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तेव्हा पर्यंत दोघेही बुडून मृत्यूमुखी पडले होते. या घटनेची कोरपना पोलीसांना तात्काळ दिली. कोरपना पोलीसांनी शेतकरी दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. मृतक शेतकरी दाम्पत्याला एक चौदा वर्षाचा मुलगा आहे.