म्हाता-या विधवा महिलेच्या जागेवर बळजबरीने बांधकाम

आमरण उपोषणाचा सईबाई कोल्हे यांचा इशारा

चंद्रपूर : कोरपना नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या एका म्हाताऱ्या अनाथ विधवा महिलेच्या जागेवर बळजबरीने एका व्यक्तीने बांधकाम केल्याने सदर महिलेने आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. सईबाई कोल्हे रा.वार्ड नंबर 3 कोरपना असे अन्यायग्रस्त महिलेचे नाव आहे.

सईबाई कोल्हे ईच्या मालकीचे कोरपना येथे शेतीवाडी आहे व सदर शेती ठेक्याने देऊन आपली उपोजीविका चालवीत आहे तिचे राहते घर वार्ड नंबर 3 मध्ये असून तिच्या पतीच्या हिस्स्यात आलेले वडिलोपार्जित घर व जागा आहे. सण 2020, 21 मध्ये तिचे घरा शेजारी व घरासमोरील श्री पुंडलिक कारेकर व किशोर कारेकर यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले. घराचे ले आऊट टाकताना नगर पंचायत इंजिनियर कु.डाखरे मॅडम हिने तीन फूट ची गल्ली आमचे दोघांचे मधात ठेवून ले आऊट टाकले परंतु खोदकाम करताना पुंडलिक कारेकर व किशोर कारेकर याने जोर जबरदस्ती करून बळजबरीने तीन फूट सोडलेली गल्ली कॉलम खोदून उभे केले व जोता बांधकाम केले. मी त्याच्या कामाला विरोध केला असता तुझ्याने जमते थे करून घे मी याच ठिकाण हुन बांधकाम करणार म्हणून जोता बांधकाम केले या बाबत मी नगर पंचायत कोरपना कडे अनेकदा लेखी व तोंडी तक्रार केली की पुंडलिक कारेकर व किशोर कारेकर यांनी केलेले बांधकाम तोडून तीन फूट ची गल्ली कायम करून द्यावी नंतर च यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मिळालेले घरकुल योजनेचे चेक देण्यात याव्हे म्हणून मी नगर पंचायत ला लेखी निवेदन दिले आहे.

माझ्या निवेदनाची दखल नगर पंचायत ने न घेतल्यास मी 15 ऑक्टोबर पासून नगर पंचायत समोर आमरण उपोषणाला बसणार आहे मी म्हातारी असून माझे वय 75 वर्ष चे आहे माझ्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास नगर पंचायत व स्थानिक प्रशासन जवाबदार राहील असा इशारा दिला आहे.