खासदार बाळु धानोरकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

किशोर बोबडे, सुमेश रंगारी यांचा पक्षप्रवेश संपन्न

घुग्घुस : शहरात काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येणाऱ्या जनसेवेच्या कार्याकडे सर्व सामान्य नागरिकांसह अन्य पक्षातील नेत्यांचा कल वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी घुग्घुस भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

आज 04 सप्टेंबरला खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या निवासस्थानी शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे नेते किशोर बोबडे तालुका प्रमुख कामगार सेना, सुमेश रंगारी कामगार उप – तालुका प्रमुख, अनील रेगुंडवार यांनी प्रवेश केला.

घुग्घुस येथे लवकरच मोठ्या संख्येने बोबडे समर्थक काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहे. खासदार बाळु धानोरकर यांनी काँग्रेस पक्षाचे दुप्पटे टाकून सेना नेत्यांचा प्रवेश घेतला व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले.

काँग्रेस पक्षच देशातील सर्व धर्मांच्या जाती – पातीच्या सर्व घटकातील लोकांना न्याय देऊ शकतो म्हणून जास्तीत जास्त युवकांनी लोकशाही रक्षणासाठी काँग्रेस पक्षाचे हात बळकट करावे असे आवाहन खासदारानी केले. याप्रसंगी याप्रसंगी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर, विशाल मादर,बालकिशन कुळसंगे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.