लखीमपूर नरसंहारातील मृतकाना युवक काँग्रेसची श्रद्धांजली 

योगी शासनाचा जाहीर निषेध

घुग्घुस : उत्तरप्रदेश येथील लखीमपूर (खिरी) येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवावर केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या अजय मिश्र या मुलांने चारचाकी वाहना खाली शेतकऱ्यांना चिरडले यात अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झाला अनेक शेतकरी जखमी झाले.
केंद्रातील मोदी सरकार हे तानाशाहीने वागत आहे.
मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेट देण्यास जाणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना गैरकायदेशीर अटक करण्यात आली.

या घटनेचा युवक काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.मृतक शेतकऱ्यांना मेंनबत्ती वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. योगी शासन मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आले. युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, अलीम शेख, मोसीम शेख, रोशन दंतलवार, विशाल मादर, इर्शाद कुरेशी, साहिल सैय्यद,देव भंडारी, ,अमित सावरकर, मोसीम (कलवा)शुभम घोडके, आरिफ शेख, रोहित डाकूर, बालकिशन कूळसंगे,दीपक पेंदोर, वस्सी शेख, अंकुश सुरोजे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.