उमरेड मध्ये जाणारी अडीचशे पेटी दारू बेलोरा फाट्यावर; गुगलमॅप वर नसलेला मार्ग शोधला दारु विक्रेत्यांनी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

अंतर वाढविण्यात स्वारस्य काय?, बंद जिल्हयात दारु उतरविण्याची शक्यता

वणी (यवतमाळ) : जाना था जपान पहुचां चिन ही म्हण पुर्वी उपऱ्यांना लागू पडायची ती आता अवैद्य दारु विक्रेत्यांना तंतोतंत लागू पडत आहे. चक्क गुगलमॅप वर नसलेला मार्गच दारु विक्रेत्यांनी शोधला आहे. नागपुर जिल्हयातील उमरेड तालुक्यात पोहचविण्यात येणाऱ्या देशी दारुचे वाहन चंद्रपुर जिल्हयाच्या सिमेलगत बेलोरा फाटयावर तपासण्यात आले असता वाहतुक परवान्यावरील मार्ग संशयास्पद आढळून आल्याने शिरपुर पोलीसांनी वाहन ताब्यात घेत तपासाची गती वाढवली आहे.

यवतमाळ येथील राजु वाईन एजन्सी यांनी वाहन क्रमांक एम.एच. 40 बी.जी. 8749 या वाहनात राॅकेट संत्रा या कंपनीच्या 250 पेटया देशी दारु नागपुर जिल्हयातील उमरेड तालुक्यात असलेल्या वायगांव.घोटूरली येथे पोहचविण्याकरीता वाहतुक परवाना ;टी पी दि. 4 जुन ला दुपारी 12 वाजता निर्गमीत केला. त्या परवान्याची मुदत दि. 5 जुन ला सायंकाळी 5 वाजता पर्यंत होती. परंतु त्या वाहतुक परवान्यावर दर्शविण्यात आलेला मार्ग प्रशासनाच्या डोळयात धुळफेक करण्यासाठी तर अवलंबण्यात आलेला नाही ना! अशी शंका निर्माण होत आहे.

यवतमाळ ते उमरेड हे अंतर केवळ 160 ते 165 किलोमिटर चे आहे याकरीता यवतमाळ, कळंब, वर्धा, बुटीबोरी, उमरेड असे जाता येईल किंवा यवतमाळ, कळंब, देवळी, वर्धा, समुद्रपुर ते उमरेड असा मार्ग आहे त्याच प्रमाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरुन सुध्दा यवतमाळ, करंजी, वडकी, वडनेर, जाम ते उमरेड हा जवळचा वाहतुकीस योग्य मार्ग असतांना दारुबंदी असलेल्या व मोठया प्रमाणात दारु तस्करी करीता ख्याती मिळवलेल्या चंद्रपुर जिल्हयाच्या सिमे कडून दुरचे अंतर गाठत वाहतुक परवान्यानुसार यवतमाळ, वणी, बेलोरा फाटा, निलजई ते उमरेड असे तब्बल 235 किलोमिटरचे मार्गक्रमण करण्यात स्वारस्य काय हा संशोधनाचा विषय झाला आहे.

चंद्रपूर जिल्हयात दारुबंदी लागू झाल्या नंतर सिमावर्ती भागातुन दारु तस्करीला चांगलेच उधान आले आहे. विविध फंडे अवलंबत अवैद्य दारु चा पुरवठा केल्या जातो. त्याच प्रमाणे लगत असलेल्या तेलंगाना व यवतमाळ, नागपुर येथून सुध्दा मदयपींची तल्लफ भागविण्याकरीता लिकर किंग सरसावल्याचे दिसत असुन अधिकृत वाहतुक परवानाद्वारे दारुची तस्करी तर होत नाही ना अशी चर्चा रंगायला लागली आहे.

  • उमरेड कडे परवाना धारक वाहन चंद्रपूर मार्गाने जात असल्याने ते वाहन बेलोरा येथे करण्यात आलेल्या नाकेबंदी मध्ये तपासणी करण्यात आली असता वाहतूक परवाना यवतमाळ, वणी मार्गे चंद्रपूर ते उमरेड असा देण्यात आल्याने या बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागा कडे पत्र पाठवून या मार्गाने दारू वाहतूक परवाना कोणत्या आधारे देण्यात आला याची माहिती मागितली आहे त्यानंतरच कारवाही करण्यार येणार आहे.
  • अनिल राऊत,ठाणेदार शिरपूर पोलीस स्टेशन