चंद्रपूर माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी (धन्नू महाराज) यांचे निधन

चंद्रपूर : शहराचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते गयाचरण त्रिवेदी उर्फ धन्नू महाराज यांचे मंगळवारी   निधन झाले. शहरातल्या प्रत्येकांच्या तोंडात बसलेले नाव धन्नू महाराज, चंद्रपुरच्या राजकारणात दमदार, धुरंधर तसेच प्रभावशाली व्यक्तिमत्व, शहरात गणराज ट्रॅव्हल्स नावाने खाजगी बसेसचा व्यवसाय असलेले गयाचरण त्रिवेदी आज पदद्याआड झालेत.

चंद्रपुर शहरातली 7 मजली बिल्डिंग ही त्यांच्या काळातली, प्रशासनावर वचक काय असते, तसेच प्रत्येक निवडणुकीत “मोर” दाखविनारा चंद्रपुरचा महाराज काळाआड़ झाला.

स्वता बांधलेल्या दुर्गामाता मंदिरात हेलीकॉप्टर ने पुष्पवर्षाव करणारा भक्त चंद्रपुरकर कधीही विसरनार नाही.