संस्थेच्या सदस्यांकडून मुख्याध्यापकास मारहाण

◆ शिक्षक संघटेकडून निषेध,दोघांवर गुन्हे दाखल

चंद्रपूर : जिवती तालुक्यातील दमपुरमोहदा येथील पन्नाबाई पोष्ट बेसिक आश्रम शाळेच्या मुख्यध्यापकास संस्थेचे सदस्य सुर्यकांत राठोड व त्यांचा मुलगा अंकित राठोड यांच्याकडून मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली असून त्यांच्यावर जिवती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार सोमवारी मुख्यध्यापक चिकूलवार यांनी वातावरणातील बद्दल पाहूण दुपारी ३.वाजता शाळेला सुट्टी दिली.त्यामुळे संपूर्ण विद्यार्थी घराकडे निघाले.माञ सुट्टी देऊनही विद्यार्थी वर्गाबाहेर येत नसल्याने मुख्यध्यापक चिकूलवार यांनी वर्गाकडे गेले.तेव्हा संस्थेचे सदस्य सुर्यकांत राठोड व वर्गशिक्षक विद्यार्थी घेऊन बसले होते.तेव्हा मुख्यध्यापकांनी संस्थेच्या सदस्यांना मुलांना सुट्टी देण्याची विनंती केली.माञ मद्यप्राशन करून असलेले संस्थेचे सदस्य सुट्टी देण्याऐवजी तु मला सांगणारा कोण अशी भाषा वापरात अपमानीत करून शाब्दीक बाचाबाची करत मारहाण करू लागले.तेवढयात त्याचा मुलगाही आला त्यांनीही मारहाण करित असताना शाळेतील कर्मचाऱ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न करित असताना त्यांना धमकावणी केली त्यामुळे कुणीही जवळ आले नाही.जवळ असलेला उचलून मुख्यध्यापकास फेकून मारल्याने डोक्याला मार लागल्याने ते रक्तबंबाळ झाले होते.त्यांच्येवर जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून संस्थेचे सदस्य सुर्यकांत राठोड व त्यांचा मुलगा अंकित राठोड यांच्या विरोधात जिवती पोलिसात तक्रार दाखल करून मारहाण केल्याप्रकरणी जिवती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक जगताप करित आहे.

मारहाण प्रकरणी तहसिलदारांना निवेदन
मद्यप्राशन करून शाळेत आलेल्या संस्थेच्या सदस्य तथा संस्थापकाचे जावई सुर्यकांत राठोड व त्यांचा मुलगा अंकित राठोड अमानुषरित्या मारहाण केल्याबद्दल विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने जाहिर निषेध करित जिवती तहसिलदारांना निवेदन दिले असून मुख्यध्यापकांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणीही संघटनेच्या वतीने केली आहे.