स्थानिक रोजगारा साठी वॉशरीज विरोधात मनसेचा रस्ता रोको आंदोलन

घुग्घुस : येथील गुप्ता वॉशरीज मध्ये स्थानिक युवकांना रोजगार देण्यासाठी व स्थानिक ट्रान्सपोर्टर यांना रोजगार देण्याच्या मागणी करिता जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांना निवेदन देण्यात आले.

मात्र प्रशासना तर्फे कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने मनसे जिल्हाध्यक्ष रविष सिंग यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

येत्या पांच दिवसात स्थानिकांना न्याय न मिळाल्यास बेमुद्दत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी सदस्यगण व नागरिक उपस्थित होते.