उपनिबंधक कार्यालयाची चंद्रपुरात सावकाराच्या घरी धाड

कोरे धनादेश, विविध बँकाचे पासबुके, गहाण पावती, खरेदी दस्तू व ऐंशी हजार रोख रक्क्म जप्त

चंद्रपूर : येथील सहकार विभागाच्या अधिकार्‍यांनी काल बुधवारी सकाळी 11.00 वाजता दरम्यान चंद्रपुर रेल्वेस्टेशन परीसरामध्ये महाराष्ट्र सावकारी ( नियमन ) अधिनियम 2014 चे कलम 16 अंतर्गत सावकारकीचा व्यवसाय करणारे अशोक दुधे यांचे घरी धाड टाकली.

सदर धाडीमध्ये दुधे, यांचे घरून मोठ्या प्रमाणावर कोरे धनादेश, विविध बँकाचे पासबुके, गहाण पावती, खरेदी दस्तू व रोख रक्क्म ऐंशी हजार फक्त जप्त केली . सदरची कारवाई ही जिल्हा उपनिबंधक पि.एस.धोटे, यांचे आदेशान्वये करण्यांत आली.

झडती पथकामध्ये सहाय्य्क निबंधक, शडी.यु.शेकोकार हयानी पथक प्रमुख, म्हणुन कामकाज केले. तपासणी पथकामध्ये सरपाते, भोयर, चौधरी, भिम्रतवार, श सरीता दरणे हयानी झडतीचे कांमकाज व दोन पंच व पोलीस संरक्षणामध्ये पार पाडले.