नगर परिषदेच्या इमारतीला लागलेल्या आगीची पोलिसा पासून आर्मी पर्यत चौकशी करा : भाजयुमो चे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे

घुग्घुस : नगर परिषदेला आज पहाटे लागलेल्या आगीत ग्राम पंचायत चे रेकोर्ड व विजेच्या साहित्य खाक झाली.सदर आगीची चौकशी सरकार कडून तर पोलीस पासून आर्मी पर्यत सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजयुमो चे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केली.
नगरपरिषदेमध्ये सि. सि. टी. व्ही. कॅमेरे लावलेले आहेत. रात्रपाळीत कर्मचारी नियुत्क केलेले आहेत. मग हि आग कशामुळे लागली याची उच्चस्तरित चौकशी होणे अत्यंत आवश्यकता आहे.

जोपर्यंत सखोल चौकशी होणार नाही तोपर्यंत भाजपचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही अशी भावना विवेक बोढे यांनी बोलून दाखवली.

या वेळी माजी उपसरपंच संजय तिवारी माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, अमोल थेरे, रत्नेश सिंह, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, रज्जाक शेख, पांडुरंग थेरे, विनोद जिंजर्ला, कोमल ठाकरे, नितीन कटारे, सतीश कामातवार, दशरथ कांबळे तथा अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.