पट्टेदार वाघाच्या बछड्याच्या सांगाड्यासह दोन आरोपी अटकेत

◆ दहा दिवसाच्या बछड्याला मारले ठार

चंद्रपूर : गुप्त माहितीनुसार नागपुर – चंद्रपुर – पडोली – अर्जानगर येथे धाड टाकून वाघाच्या नवजात बछड्याच्या अवयवासह दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले. सविस्तर वृत्त असे कि, आरोपी नामे लोमेश नानाजी डबले रा. चिचबोड़ी ता. सावली जि. चंद्रपुर, कालिदास मारोती रायपुरे रा. मसाळ पो.दुर्गापुर त. जि. चंद्रपुर यांनी माहे मे 2021 च्या सुमारास चिचबोड़ी ता. सावली येथील जंगलातुन वाघाच्या नवजात शिशु ( अंदाजे वय 10 दिवस ) आणून त्यास कुरतेने मारून त्यांचे संपूर्ण शरीर जतन केले आहे. त्यानंतर त्यास विक्री करण्याच्या दृष्टीने संपर्क केला.

याबाबतची माहिती गुप्तहेराकडून वनविभागास कळली. त्यानुसार सापळवण्याची आखणी करण्यात आली. गेले 10 दिवस सतत त्या मार्गावर राहुन वनविभागाचे पथक कार्यरत होते. दिनांक 06/10/2021ला एम. आय. डी. सी. बुटीबोरी येथे विक्री व्यवहार करनार असल्याची माहिती प्राप्त झाली व त्यानुसार सापळा रचन्यात आला. मात्र आरोपी कालिदास रायपुरे यांनी मौजा पडोली जिल्हा चंद्रपुर येथे व्यवहार करणार असल्याचे सांगितले त्यानुसार अरुण गादेवार वनक्षेत्रपाल ( दक्षता पथक ) चंद्रपुर यांचेशी संपर्क साधुन त्यांना पथकात शामिल करुण वाघ बछडा शरीरासह दोन्ही आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. मागील वाघाचे अवयव तस्करी प्रकरणात काही धागे-दोरे आहेत का? याबाबतची तपास सुरु आहे.

या धडीत डॉ. भरत सिंग हाडा, उपवनसंरक्षक नागपुर व अरविंद मुंडे, उपवनसंरक्षक चंद्रपुर वनविभाग चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात, एन. जी. चांदेवार, सहायक वनसंरक्षक जंकास-2, एल. व्ही. ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी, अरुण गादेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी (दक्षता पथक ) चंद्रपुर, टवले, शेंडे, जाधव, कुल्लरकर वनरक्षक यांनी धाड यशस्वी केली. पुढील तपास एन. जी. चांदेवार सहायक वनसंरक्षक जंकास-2, उपविभाग उमरेड हे करित आहेत.