चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील WCL संबंधित समस्या मार्गी लागणार : खासदार बाळू धानोरकर

CIL चेअरमन सोबत नागपूर येथे बैठक संपन्न

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या, कामगारांच्या तसेच ग्रामस्थांच्या विविध समस्याबाबत खासदार बाळू धानोरकर यांनी वेकोलि इंडिया चे चेअरमन प्रमोद अग्रवाल, वेकोलि मुख्यालय नागपूर चे सी.एम.डी मनोज कुमार, संजीव कुमार डी.पी. वेकोली, डीपी सी आय एल यांच्या सोबत वेकोली मुख्यालय नागपूर येथे बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली.

वेकोलि माजरी क्षेत्रातील माईन्स मधील होणाऱ्या जड वाहतुकीमुळे खांबाडा कडे जाणारा 36 किमी रस्ता मोठ-मोठे खड्डे पडून अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याकरिता वेकोली कडून 50 लाख व सी आय एल कडून 50 लाख रुपये आजच्या बैठकीत तात्काळ मंजूर केले असून पुढील वर्षात पुन्हा 50 लाख रुपये देण्याचे चेअरमन प्रमोद अग्रवाल यांनी मान्य केले.
सास्ती धोपटाला येथील प्रकाल्पग्रस्तांचे लवकरच करारनामे व चेक वाटप चे काम सुरु करू असे आश्वासन केले.

वेकोलि प्रकल्पग्रस्तांची कामे सुरळीत होण्यासाठी वेकोलिच्या क्षेत्रनिहाय कॅम्पचे आयोजन करून वेकोलि व महसूल विभागाचे कर्मचारी समन्वयाने काम करतील तसेच या कामी सेवानिवृत्त पटवाऱ्यांना करारनाम्यावर घेऊन मदत घ्यावी अशी सूचना खा. धानोरकर यांनी केली. वेकोलिच्या सर्व क्षेत्रीय हॉस्पिटल्स मध्ये वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्सेस इत्यादींच्या रिक्त जागा त्वरित भरण्याच्या खा. धानोरकर यांच्या सूचनेला हिरवी झेंडी मिळाली. वेकोलि वणी क्षेत्र इथे अत्याधुनिक मध्यवर्ती हॉस्पिटल निर्मिती करण्याची मागणी देखील यावेळी केली. तसेच वेकोलि क्षेत्रीय हॉस्पिटल्स मधून नागपूर येथे रेफर करण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ करून रुग्णवाहिका उपलब्ध करण्याबाबत देखील विशेष काळजी घेण्याची सूचना खा. धानोरकर यांनी केली