शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतबालके मातापित्यांच्या स्वाधीन

0
278
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

जड अंत:करणाने मृत बाळांना घेऊन आई वडील गावी रवाना

अजूनही काही बालके रूग्णालयातच, मातांपितांचे लेकरासाठी हुंदके आणि आक्रोश

भंडारा : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आज शनिवारी मध्यरात्री नवजात शिशुच्या कक्षाला शार्टसकिटमुळे लागलेल्या आगीत दहा बालकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. सकाळी दहाही बालकांच्या मृताचे शवचिव्छेदन करण्यात आले असून त्यापैकी काही बालकांना अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या माता पित्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मातापित्यांनी जड अंत:रणाने बालकांना स्विकारून बालकांना घेऊन गावी रवाना झाले आहे. काही बालके अजूही रूग्णालयातच आहेत. मृत 10 बालकांपैकी 9 जणांची ओळख पटली असून एका बालकांची अद्याप ओळख पटली नाही.

जन्मास आल्यानंतर नवजात शिशु कक्षात एकुण 17 बालकांवर उचार सुरू होते. शनिवारी 9 जानेवारी 2021 ला मध्यरात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बार्न युनिट मधून धूर निघत असल्याचे लक्षात आले. आऊट बॉर्न मध्ये मोठ्या प्रमाणात निघालेल्या धुरामुळे गुदमरून 10 बालकांचा मृत्यू झाला. तर सात बालकांना कक्षातून सुखरूप वाचविण्यात यश आले. सकाळी 11 वाजताच्या सुमारास दहाही बालकांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यापैकी 9 बालकांची ओळख पटली असून एकाची अद्याप ओळख पटली नाही. त्यापैकी काही मृत बालकांना मातापित्याच्या स्वाधीन करून गावी पोहचविण्यात आले आहे. तर काही बालके अजूनही रूग्णालयातच आहेत.

ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये हिरकण्या हिरालाल भानारकर (उसगाव साकोली), योगिता विवेक धुडसे (श्रीनगर पहेला), सुषमा पंढरी भंडारी, प्रियंका जयंत बसेशंकर, गिता विश्वनाथ बेहरे (भोजापूर), कविता बारेलाल कुंभारे, दुर्गा विशाल रहांगडाले, वंदना मोहन सिडाम, सुकेशनी धर्मपाल आगरे या मातांच्या बालकांचा समावेश आहे. मा्त्र एकाची ओळख अद्याप पटली नाही. शवविच्छेदनानंतर काही काही बालकांना मातापित्यांच्या स्वाधीन करून त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी पोहचविण्यात आले आहे. तर काही मृत बालके अजूनही रूग्णालयातच आहेत.

जी सात बालके सुरक्षीत आहेत, त्या मध्ये शामकला शेंडे, दिक्षा दिनेश खंडाते- (जुळे),दिक्षा दिनेश खंडाते,अंजना युवराज भोंडे,चेतना चाचेरे,करिश्मा कन्हैया मेश्राम, सोनू मनोज मारबते ह्या मातांच्या बालकांचा समावेश आहे.