मारहाण करणा-या आरोपीस तिन महिन्याची शिक्षा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

शेतीच्या हिस्सेवाटणीवरून झाला होता भांडण

चंद्रपूर : शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने भाशा व मामा यांनी संगनमताने फिर्यादीस लाठी काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान येथे ७ मार्च २०१४ रोजी घडली होती.

त्यानंतर फिर्यादी नीलकंठ कोंडु बुराडे वय ५२ वर्ष रा. चौगान यांनी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर सदर प्रकरणातील आरोपी नामे फाल्गुन नीलकंठ मैंद वय ४४ वर्ष व सुधाकर कोठुजी बुराडे वय ५५ वर्ष या दोन आरोपींविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीसांनी अपराध क्रमांक ३२/२०१४ नुसार भांदवी कलम ३२३,३२४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपासी अधिकारी यांनी गुन्ह्याचा कसून तपास करून सबळ पुरावे गोळा केले व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केला असता न्यायाधीश एम.जी.मोरे यांनी खटल्यातील साक्ष पुरावे तपासून दोन्ही आरोपीस कलम ३२४ मध्ये १ वर्ष तर कलम ३२३ मध्ये ३ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
यामध्ये सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अधिवक्ता श्री.देवेंद्र बारस्कर यांनी बाजू मांडली तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार सुदेश कुमरे यांनी काम बघितले. सदर प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी सहकार्य केले.