चंद्रपुरात बार कामगारांनी केला आमदार पडळकरांचा निषेध

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

प्रतिकात्मक पुतळायास जोडयांनी मारहाण

चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आली. शासनाच्या परवानगीने बार आणि दुकाने सुरु झाली. शेकडो बेरोजगारांच्या हाताला काम मिळालेले. मात्र, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दारूबंदी उठविण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी करण्यासाठी खटाटोप सुरु केल्याचा आरोप करीत वाईन बारमधील नोकरांनी आमदार पडळकरांचा निषेध करीत प्रतीकात्मक पुतळ्याला जुत्यांनी चोप दिला.

सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर अनेकांवर बेरोजगारीची पाळी आली होती. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यातील दारूबंदी उठवीत अनेकांच्या हाताला काम दिले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सोयीचे झाले आहे.

मात्र,भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दारू उठविण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी करण्यासाठी खटाटोप सुरु केले आहे. त्यामुळे बारमधील नोकरांनी आमदार पडळकर यांचा निषेध नोंदविला.