मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांची नाणे संग्रहालयाला भेट

0
23

◾डॉ. म्हैसेकर यांच्या संकल्पनेतून झाली होती नाणे संग्रहालयाची निर्मिती

चंद्रपूर : राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांचे सल्लागार आणि चंद्रपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर (भा.प्र.से.) यांनी आज गुरूवारी (११ फेब्रुवारी २०२१) ला स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहातील नाणे संग्रहालयाला (Coin Gallery) भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती विद्युत वरखेडे यांची उपस्थिती होती.

यावेळी इंटैक चंद्रपूर अध्याय चे सहसंयोजक प्रविण निखारे आणि सचिन जहागिरदार यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. म्हैसेकर यांचे स्वागत केले.

उल्लेखनीय म्हणजे ज्यावेळी डॉ. म्हैसेकर चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते त्याचवेळी त्यांच्याच संकल्पनेतून सदर नाणे संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली होती. नाणे संग्रहालयातील दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शनीची भरभरून प्रशंसा करित त्यांनी अशोक सिंह ठाकुर यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी लता मंगेशकर आर्ट गॅलरीतील विविध ऐतिहासिक प्रतिमांचे अवलोकन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here