गांधीनगर येथील स्वच्छते साठी स्वतःचे वाहन लावून कचरा उचलणार : राजूरेड्डी

घुग्घुस : येथील वेकोलीच्या गांधी नगर वसाहतीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून कचरा कुंडी शोभेची वस्तू झाली असून त्यात मोठं – मोठी झाडे उगवली असून कचरा हा खुल्या परिसरातच टाकल्या जातो.

यामुळे नागरिकांना जीवघेण्या आजाराला बळी पडावे लागत आहे.

येथील समस्या निराकरणा करिता वेकोली वसाहतीच्या नागरिकांनी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्याकडे मदद मांगीतली असता आज काँग्रेस कमिटी तर्फे गांधी नगर येथे भेट देण्यात आली.

समस्यांची दखल घेत. वेकोली अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. उद्या पासून वेकोली वसाहतीतील घाण कचरा उचलण्या करिता स्वतःच्या दोन ट्रॅक्टर लावण्यात येणार असल्याची ग्वाही ही उपस्थित नागरिकांना दिली. याप्रसंगी शहर अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर,सुकमार गुंडेटी, नुरुल सिद्दिकी, रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी, रोहित डाकूर, आरिफ शेख, अंकुश सपाटे, सुनील पाटील, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.