‘तो’ साप घेवूनच दवाखान्यात आला !

आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच नसल्याने उपचारा विना परत गेला

चंद्रपूर : घुग्घुस येथील पिंकू अहमद सैय्यद या युवकास रविवारी दुपारच्या सुमारास सर्प दंश झाल्याने सदर युवक साप घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आला. पण रुग्णालयात कर्तव्यव्यावरील मेडिकल ऑफिसर हजर नसल्यामुळें आरोग्य केंद्रात अँटीवेनम उपलब्ध असतांना लावण्यात आले नाही, त्याला नर्स नी चंद्रपूर रेफर करण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.वाकदकर यांची बदली झाल्याने अजून त्यांच्या जागी डॉ.दामिनी शालीकराव थेरे (BAMS), श्रद्धा लक्ष्मण माडुरवार (BAMS ) यांची कंत्राटी पद्धतीने 09 सप्टेंबर रोजी घुग्घुस येथे नियुक्ती करण्यात आली. त्या अजून रुजू झाल्या नाही. घुग्घुस हा औद्योगिक शहर असून येथे मजुरवर्ग, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

या आरोग्य केंद्रा अंतर्गत जवळपास पंधरा गाव येतात हजारो नागरिकांच्या उपचारासाठी MBBS वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असतांना याठिकाणी BAMS नियुक्त करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र घुगुस आकस्मिक रुग्णांची नियमित आवक लक्षात घेता या ठिकाणी 3 MBBS Dr ची पदस्थापना देण्यात आली आहे.

आज पर्यंत MBBS वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले.

मात्र पहिल्यांदाच दोन BAMS महिला वैद्यकीय अधिकारी नियुक्त झाल्याने परिसरात तर्क – वितर्काना उत आला असून सदर वैदकीय अधिकारी हे एका जिल्हास्तरीय राजकीय नेत्यांचे जवळचे असल्याने त्यांना हे संधी मिळाल्याची चर्चा आहे.