भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी शुभम डोंगे यांची निवड

चंद्रपूर : सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या येथील शुभम डोंगे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केली.

आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता युवा मोर्चाचे संघटन वाढवावे, युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त युवकांना भाजपमध्ये सामील करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे, अशी अपेक्षा विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

डोंगे यांना मुंबई येथे विक्रांत पाटील यांच्या निवासस्थानी नियुक्तीपत्र देण्यात आले. ते आपल्या निवडीचे श्रेय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजीमंत्री मदनभाऊ येरावार, माजी मंत्री हंसराज अहीर, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, भाजप विदर्भ संघटनमंत्री उपेंद्रजी कोठेकर, आमदार श्वेता महाले, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांना देतात.