अखेर धोपटाळा खाण प्रकल्पग्रस्तांना मिळणार 175 कोटी व 1080 नोकर्‍या

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पुढाकार

चंद्रपूर : धोपटाळा कोळसा खाण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला, नोकरी तसेच स्थानिकांना रोजगारासंबंधी मार्जी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चर्चा, बैठका व पाठपुरावा केल्यामुळे धोपटाळा प्रकल्पग्रस्तांना मोबदला व नोकर्‍या मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे कळविण्यात आले आहे.

23 सप्टेंबर रोजी या प्रश्नाला घेऊन हसराज अहीर यांनी वेकोलि नागपूर मुख्यालयात बैठकी घेतली. या बैठकीत धोपटाळा खाणीस विनाकारण विलंब होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी महिनाभरात हा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलनात्मक भुमिका घेवू, असा इशारा दिला होता. सास्ती, धोपटाळा, कोलगाव, बाबापुर, मानोली या गावातील शेतकर्‍यांची 870 हेक्टर शेतजमीन वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील धोपटाळा युजी टु ओसी या प्रकल्पाकरीता 2015 मध्ये सीबी. अ‍ॅक्ट 1957 च्या सेक्शन 9 च्या अधिसुचनेनुसार संपादित करण्यात आली होती. या प्रकल्पात सुमारे 175 कोटी रूपये प्रकल्पग्रस्तांना प्राप्त होणार असून, 1080 नोकर्‍यासुध्दा मिळणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना फार मोठा आर्थिक लाभ उपलब्ध होईल.

एमपीसीएलने करारनाम्यावर स्वाक्षरी केली. त्यामुळे मोबदल्याचा मार्ग मोकळा झाला. हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला व आभार मानले. यावेळी भाजपा नेते खुशाल बोंडे, मधुकर नरड, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, जि.प. सभापती सुनील उरकुडे, अ‍ॅड्. प्रशांत घरोटे, सरपंच पुरुषोत्तम लांडे, अक्षय निब्रड, किशोर कुडे, प्रशांत साळवे यांचेसह अन्य प्रकल्पग्रस्त बांधव उपस्थित होते.