सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगिण विकासाठी सदैव समर्पण भावनेने कार्य करणार : रविन्द्र शिंदे

वरोरा-भद्रावती येथे वाढदिवसानिमित्य विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

• विवाह नोंदणी अर्जाचे शुभारंभ
• वाचनालय व बालउद्यानाचे भुमीपुजन, सत्कार, वृक्षारोपण, गरजू – निराधारांना मदत

चंद्रपूर : माझा वाढदिवस आपण अत्यंत उत्साहपूर्ण व कौंटूंबिक वातावरणात साजरा केला. यानिमित्याने दिलेल्या शुभेच्छांमुळे मला सर्वांची सेवा करण्याचे बळ मिळाले आहे. माझे वरोरा-भद्रावती तालुक्यांवर विशेष प्रेम आहे. या क्षेत्रातील बंधू -भगिनींनी दिलेल्या प्रेमाला कदापिही तडा जावू देणार नाही. माझे पाय नेहमीकरीता जमिनीवर राहील. अहंकार माझ्या व्यक्तीमत्वालाही स्पर्श करू शकणार नाही. यापुढे सुध्दा सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगिण विकासाठी सदैव समर्पण भावनेने कार्य करणार असल्याचे प्रतिपादन स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांनी केले.
भद्रावती-वरोरा तालुक्यात रविंद्र शिंदे यांच्या वाढदिवसा-निमित्य विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले. सिडीसिसी बँकेतील कर्मचारी, शेतकरी व विविध स्तरातील संघटनांनी वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा व्यक्त करत केलेल्या कामाची स्तुती केली. मान्यवरांनी व उपस्थितांनी रविंद्र शिंदे यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधानसभेचे माजी उपसभापती एड. मोरेश्वर टेंमूर्ड यांच्या हस्ते विवाह नोंदणी अर्जाचे शुभारंभ करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांची व कोविड मधील मृत परिवारातील सदस्यांची ट्रस्ट मार्फत नोंदणी करून विवाह संपन्न करण्याचे आश्वासन दिले.

या निमित्याने वाचनालय व बालउद्यानाचे भुमीपुजन, सत्कार, वृक्षारोपण, गरजू – निराधारांना मदत आदि उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी विविध ठीकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात अँड. पुरुषोत्तम सातपुते, रविंद्र शिंदे, डॉ. विजय देवतळे, डॉ. अशोक जिवतोडे, सामाजिक कार्यकर्ते पप्पु देशमुख , सामाजिक कार्यकर्ते भास्कर ताजने, अँड. राजरत्न पथाडे, बाळासाहेब पडवे, प्रेमदास पा. आस्वले. सरपंच अनिल खडके, उपसरपंच प्रदिप देवगडे, ग्रा.पं. सदस्य ईश्वर निखाडे, माजी उपसरपंच विनोद घुगल, अशोक येरगुडे, रमेश जोगी, अजय जयस्वाल, मंगेश भोयर, शेखर रंगारी व मिनाक्षी कामडी उपस्थित होते.

यावेळी केक कापून रविंद्र शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून रविंद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या वाचनालय व बालउद्यानाचे भुमीपुजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. वृक्षारोपण करण्यात आले. अँड. पुरुषोत्तम सातपुते यांच्या शुभ हस्ते चंद्रपूरचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक तथा कोरोना योध्दा व डेरा आंदोलनाचे शिलेदार पप्पु देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

शिंदे ट्रस्ट ने अनाथ मुलाचे पालकत्व स्वीकारले. वाढदिवासा निमित्य शेगाव येथील नितेश नन्नावरे ह्या अनाथ विद्यार्थ्याचे पालकत्व रविंद्र शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त स्वीकारून एक आदर्श निर्माण केला. त्यामुळे रवि शिंदे यांचे टेमुर्डे यांनी कौतुक केले.
स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने किरण लांडे, सुवर्णा घानोडे, विद्या वऱ्हाडे व गुलाब घरत यांना आर्थिक मदत देण्यात आली. एम. टेक. परीक्षा उत्तीर्ण व पी.एच.डी. करीत असलेली मिनाक्षी कामडी या विद्यार्थीनींना लॅपटॉप देण्यात आला. मिनाक्षीचा यावेळी सत्कार सुध्दा करण्यात आला. घोडपेठ येथील निराधार किरण देवराव लांडे यांच्या मुली सौदर्या इयत्ता ११ वी व सिमरण इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे. कवडाबाई सोनटक्के यांची नात भार्गवी इयत्ता ६ वी व नातू गौरव इयत्ता ४ थी मध्ये शिकत आहे. यांना आई वडील नाही. महेश दुर्गे ला आईवडील नाही. तो बी.ए . फायनल चा विद्यार्थी आहे. या सर्व विद्यार्थांना स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक कार्यासाठी मदत देण्यात येईल, असेही रविंद्र शिंदे यावेळी म्हणाले.
या प्रसंगी डॉ. विजय देवतळे, पप्पु देशमुख, भास्कर ताजने व ग्रा.पं. सदस्य ज्योती मोरे यांनी रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्याची भरभरून स्तुती केली. त्यांचे कोरोना संक्रमण कालावधीतील कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत या सर्वांनी व्यक्त केले.
अँड. पुरुषोत्तम सातपुते यावेळी म्हणाले की, रविंद्र शिंदे यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी निश्चितच गौरवास्पद आहे. त्यांनी कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत प्रशासनाच्या खांद्याला खांद्या लावुन सुमारे दिड हजार रुग्णांना मदतीचा हात दिला. यावेळी त्यांनी कुठलेही अनुदान घेतले नाही. निस्वार्थ सेवा हा त्यांचा स्वभाव गुणधर्म आहे. कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेतील त्यांचे कार्य अभिनंदनीय व प्रेरणादायी आहे. रविंद्र शिंदे यांच्या कार्यांची शासनाने दखल घेवून त्यांचा गौरव केला पाहीजे. असे अँड. पुरुषोत्तम सातपुते यावेळी म्हणाले.

यावेळी ऍड.मोरेश्वर टेमूर्डे, जयंत टेमूर्डे, ज्ञानेश्वर डुकरे,भास्कर भाऊ ताजने, ऍड. पुरुषोत्तम सातपुते , रमेश राजूरकर, दत्ता बोरेकर, खेमराज कूरेकार, डॉक्टर विजय देवतळे,पांडुरंग जाधव, बल्लू गोहकार, बाळू भोयर, वसंत मानकर, भास्कर ताजने, मंगेश भोयर प्रदीप महाकुलकर, प्रेमदास पाटील आस्वले, सतीश गिरसावळे, मधुकर ठाकरे, त्रिशूल घाटे, प्रा. धनराज आस्वले, माधव कौरासे, वसंता मानकर, उपसरपंच प्रदिप देवगडे, सरपंच अनिल खडके, ज्ञानेश्वर डूकरे, सुधाकर मोरे, विनोद मडावी, कांता बोबडे, रुपाली बावणे, वैशाली तलांडे, सखाराम पाल, पंढरी बोधे, वसंतराव खडके, भुपेश वालदे, तेजस ठक्कर श्याम जुंजीपेल्ली, सुंदरसिंग बावरे, कैलास दुधकोहळे, आकाश ढवस , प्रकाश दुधकोहळे, सुबोध शेळके आदी शेकडोच्या संख्येने नागरीक उपस्थित होते.