चंद्रपुरातील रामाळा तलाव प्रदूषण मुक्त करण्यासाठी पयर्टन मंत्र्यांचे निर्देश

चंद्रपूर : चंद्रपुरातील गोंडकालीन रामाळा तलावच्या प्रदूषण मुक्तीसाठी पर्यावरण व पर्यटन मंत्री मा.आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

काल बुधवारी मा. आदित्य ठाकरे, मंत्री, पर्यावरण व पर्यटन यांनी चंद्रपूर येथील ऐतिहासिक गोंड़कालीन रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करणे, त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी खोलीकरण व स्वच्छतेच्या कामांना गती देण्याची सूचना मुंबई येथील बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.

यावेळी मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी सोबत चंद्रपूरहुन वीडियो कान्फरेन्स द्वारा मा. जिल्हाधिकारी व संबधित अधिकारी उपस्थीत होते.