दिवाळीपुर्वी वेतनासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आंदोलन

चंद्रपूर : राज्यातील खाजगी प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक, स्थानिक स्वराज्य संस्था, आश्रमशाळेतील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर 2021 चे वेतन महागाई भत्याच्या थकबाकीसह दिवाळीपूर्वी नोव्हेंबर 2021 च्या 1 तारखेला अदा करण्यात यावे या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे सोमवार दिनांक 18 ऑक्टोंबर ला दुपारी 4 ते 5 या कालावधीत शिक्षण उपसंचालक नागपूर व अमरावती तसेच उर्वरीत जिल्हयात शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

चंद्रपूर येथील शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. तसेच सदर मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचेमार्फत मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री,व मा. शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात येत आहे.

यासंदर्भांत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी शासनास नुकतीच नोटीस पाठविली आहे.शासनाने या आंदोलनाची दखल घेवून दिवाळीपूर्वी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन 1 तारखेला अदा करावे या मागणीसाठी जिल्हा व तालुका कार्यकारीणी तर्फे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर बंधू-भगिनींना या निदर्शने आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, सहकार्यवाह जगदिश जुनगरी, जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, उपाध्यक्ष सुनिल शेरकी, गंगाधर कुनघाटकर, नामदेव ठेंगणे, मंजुशा धाईत, सहकार्यवाह अनिल कंठीवार, शालिक ढोरे, नितीन जिवतोडे, सोनाली दांडेकर, वसुधा रायपूरे, दिपक धोपटे, मारोतराव अतकरे, प्रमोद कोंडलकर, देवराव निब्रड, श्रीराम भोयर, सचिन तपासे, मनोज वासाडे,रामदास आल्लेवार, धनंजय राऊत, रंजना किन्नाके, ज्ञानेश्र्वर सोनकूसरे, अनिल डहाके, प्रभाकर पारखी, आंनद चलाख, तथा सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी केले आहे.