शिक्षणमंत्र्यांनी घेतली डेरा आंदोलनाची दखल ; अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे यांना तडकाफडकी बोलाविले मंत्रालयात

0
10

चंद्रपूर : 500 कोविड योध्दे कंत्राटी कामगारांनी सात महिन्यांपासून थकित पगार देण्याच्या मागणी जनविकास कामगार संघाच्या नेतृत्वात 35 दिवसांपासून सुरू केलेल्या डेरा आंदोलनाची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दखल घेतली आहे. चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे यांच्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी नाराज दाखवून त्यांना आज सोमवारी तडकाफडकी मंत्रालयात बोलविल्याची आल्याची सुत्रांची माहिती दिली आहे.

अधिष्ठाता डॉ हुमणे यांनी थकित पगारा बद्दल राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच जिल्हा प्रशासनाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये इंटरनॅशनल व अभिजित सिक्युरिटी एजन्सीला जुलै २०१९ मध्ये सफाई कामगार, कक्ष सेवक, सुरक्षा रक्षक इत्यादी मिळून 501 कामगार लावण्याचा कार्यादेश तत्कालीन अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे यांनी दिला होता.

त्यामुळे पाचशेच्या जवळपास कंत्राटी कामगारांचा थकीत पगार देण्यात यावा अशी मागणी जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी वारंवार पत्रव्यवहार करून केलेली होती.मात्र कंत्राटदारच नसल्याने पगार कोणाच्या मार्फत करायचा हा प्रश्न निर्माण झाला. अधिष्ठाता कार्यालयातील भ्रष्टाचार व भोंगळ कारभारामुळे एक वर्ष लोटूनही कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

शासनाने थेट कामगारांच्या खात्यात पगार जमा करावा अशी मागणी जन विकास कामगार संघातर्फे करण्यात आलेली आहे.मात्र यासाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता असल्यामुळे जिल्हा कोषागार विभागाने त्रुटी काढून कामगारांच्या पगाराचे देयके वैद्यकीय महाविद्यालयाला परत पाठवली.जिल्हा कोषागार विभागाने या प्रकरणात शासनस्तरावरून कार्योत्तर मंजुरी आणण्याची सूचना केली.मात्र कंत्राटदाराची नियुक्ती करण्यास विलंब झाला ही बाब लपविण्यासाठी अतिरिक्त कामगारांच्या नियुक्तीमुळे पगार देण्याचा प्रश्न निर्माण झाला अशी चुकीची माहिती अधिष्ठाता डाॅ.हुमणे यांनी जिल्हा प्रशासन तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाला दिली.कंत्राटदाराने २०० कामगार अतिरिक्त लावल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांना देऊन अतिरिक्त कामगारांच्या चौकशीसाठी संचालक स्तरावरून समिती सुद्धा बोलवण्यात आली. या समितीने केलेल्या चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे डाॅ. हुमणे यांनी शासनाला चुकीची माहिती पुरविल्याचे सिद्ध झाले असा आरोप जनविकास चे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केलेला आहे.या सगळ्या प्रकारामुळे थकित पगाराचा प्रश्न चिघळला व वैद्यकीय महाविद्यालयात कामगारांनी हल्लाबोल आंदोलन केले.या सर्व प्रकाराची वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी गंभिर दखल घेतलेली असून अधिष्ठाता डॉ.हुमणे यांना तातडीने मुंबईला मंत्रालयामध्ये बोलावून घेतलेले आहे.

Twitter
WhatsApp
Telegram
Pinterest
ReddIt
Email
Linkedin
Previous articleसुनील पाटील यांची काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
Editor- K. M. kumar