एक आठवडा संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविणार : मुख्यधिकारी आर्शिया जुही

विविध समस्या निवारणासाठी काँग्रेसची मुख्याधिकाऱ्यांना भेट यशस्वी

घुग्घुस : ग्रामपंचायतचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर आठ महिने लोटून गेले असतांना अजून देखील नगरपरिषदेची निवळणुकी झाल्या नसल्याने नगरपरिषदेचा कारभार प्रशासक व मुख्यधिकारी यांच्या भरवश्यावर चालत असून आज घुग्घुस येथील जवळपास सर्वच वॉर्डात खालील प्रकारचे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.

कचरा सफाई करणाऱ्या ट्रॉली नियमितपणे येत नाही.
सोलर पॅनल बंद स्तिथीत पडले आहे. अनेक वॉटर एटीएम बंद पडलेले आहेत. शहरात अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्याने त्याठिकाणी लाईट लावण्यात यावे. रस्ते, नाल्या नाहीत त्यांची यादी बनवून आवश्यक ठिकाणी तातळीने रस्ते नाल्या टाकण्यात यावे.
शहरातील कचराकुंडी स्वच्छ करण्यात यावे.
बंद पडलेल्या हँडपंप दुरुस्ती करण्यात यावे व तोटी नसलेल्या नळाला तोट्या लावण्यात यावे.
बंद पडलेले सोलार पॅनल शुरू करण्यात यावे.
शहरात सर्वत्र झाड – झुडपे वाढल्याने सांप – विंचू यासारख्या विषारी जिवापासून नागरिकांना धोका निर्माण होत आहे.

करिता खालील समस्या सोडविण्यासाठी घुग्घुस नगरपरिषदेची मुख्यधिकारी आर्शिया जुही यांची भेट काँग्रेस घेऊन समस्या निवारणाबाबत चर्चा करण्यात आली असता मुख्यधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना बोलवून तातळीने समस्या सोडविण्याचे आदेश दिले.
येत्या दोन दिवसांत दोन ट्रॅक्टर द्वारे संपूर्ण शहरातील कचरा स्वच्छतेची मोहीम राबविणार असल्याची माहिती दिली.

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, नुरुल सिद्दिकी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.