पतिची आत्महत्या तर पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : आज मंगळवारी रोजी पहाटेच्या सुमारास घुग्घुस येथील अमराई वार्ड क्र. एक येथे राहणारे सुरज गंगाधर माने (२८) यांनी घराच्या अंगनातील कडुनिंबाच्या झाडाच्या फांदीला नायलनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केले तर त्यांच्या रत्नमाला उर्फ सोनी माने (२५) पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

गंभीर अवस्थेत असलेल्या रत्नमाला माने यांना घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविले परंतु त्यांची प्रकृर्ती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. सहा.पो.नि. संजय सिंग पोहवा. मंगेश निरंजने, महेश मांढरे, स्वप्नील बोंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविला. सुरज व रत्नमाला यांचा प्रेमाविवाह असून त्यांना आयुष ४ वर्षाचा व आर्यन २ वर्षाचा अशी दोन लहान मुल आहेत.

कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी किंवा ही आत्महत्या कि हत्या आहे अश्या विविध प्रकारच्या चर्चा परिसरात होत आहे. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.