जिंदल ग्रुप खासगी विमानाने चंद्रपुरात

आमदार जोरगेवारांची विनंती, रोजगार निर्मितीबाबत चर्चा

चंद्रपूर : उद्योगातून रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. याकरिता ते जिंदल स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेडचे सीओ करोगी यांच्या संपर्कात होते. अखेर ते जिंदल स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेडच्या गृपसह खासगी विमानाने चंद्रपुरात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत जिंदल स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेडचे जीएम नागी, स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेड उपाध्यक्ष बी.ए. राजू यांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी एमइएलच्या विश्रामगृहात आमदार किशोर जोरगेवार यांच्यासोबत त्यांनी जवळपास तासभर चर्चा केली. याप्रसंगी मधुसूदन रुंगठ्ठा, प्रदीप माहेश्वरी यांचीही उपस्थिती होती.

मान्यवरांनी चंद्रपुरातील फेरो अलॉय प्लाँट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनतर आमदार जोरगेवार यांच्या शिष्टमंडळाने प्लाँट दाखविला. यावेळी त्यांनी पूर्ण प्लाँटचे निरीक्षण केले. त्यांनतर येथीलच विश्रामगृहात त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत जवळपास तासभर चर्चा केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरातील खनिज संपत्ती व भौगोलीक स्थितीची त्यांना माहिती दिली.

या भेटीमुळे भविष्यात जिंदल स्टिल अॅण्ड पॉवर लिमिटेड चंद्रपुरात उद्योग सुरू करेल अशी आशा निर्माण झाली आहे. असे झाल्यास चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी विदर्भ इंडस्ट्रीअलचे अध्यक्ष मधुसूदन रुंठ्ठा, विदर्भ इकॉनॉमी डेवलप्मेंड कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी, एमईएलचे नरेश शर्मा, अजय जयस्वाल, पंकज गुप्ता, ललीत कासट यांची उपस्थिती होती.