माँ शक्ती दुर्गा मंडळा तर्फे रक्तदान शिबीर संपन्न

ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी रक्तदान करून केले शिबिराचे उदघाटन

घुग्घुस : येथील माँ शक्ती दुर्गा मंडळाने स्तुत्य उपक्रम राबवून परिसरात एक आदर्श निर्माण केला आहे. मंडळाच्या वतीने सोळा ऑक्टोबर रोजी आमराई वॉर्ड क्र. एक चांद शाह वली दर्गा परिसरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले. यात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राहुल गांगुळे, ठाणेदार पोलिस स्टेशन, मा. डॉ. डी.सी. आनंद सर तसेच डॉ. समर्थ सर (राजीव रतन केंद्रीय चिकिस्तालय हॉस्पिटल) हे उपस्थित होते. याप्रसंगी मंडळा तर्फे कोरोना योद्धाचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

घुग्घुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी स्वतः रक्तदान करीत कार्यक्रमाची सुरुवात केली व उपस्थितांना रक्तदानाचे महत्त्व विशद केले.
यासोबतच पवन आगदारी, सुरज बहुराशी,प्रीतम अट्टेला, दीपक दुर्गे, पूनम ढोले, रितीक जंगम,आशिष जंगम, सुरज दुर्गमवार, दादू शाह, विकास ठेंगणे, योगेश ठाकरे, केतन वझे यासह असंख्य माता भक्तांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे मार्गदर्शक पवनकुमार आगदारी, बेंद्रे मोरपाका, अध्यक्ष गुड्डू शेख, सुरज बहुराशी, प्रीतम अटेला, वतन अटेल्ला, वतन ताटपेल्ली, रीतिक जंगम, आशिष जंगम, प्रशांत अतेल्ला, अक्ष आगदारी, दीपक दुर्गे, योगेश दुर्गे, सुहास आगदारी, राकेश आगदारी, श्रीकांत संभिजिवर, सुरज दुर्गमवार, राकेश झाडे, स्वप्नील झाडे, दीपक बहुरिया, यांनी अथक परिश्रम घेतले.