महिला प्राध्यापकाला प्रताडीत करणाऱ्या प्राचार्यांवर कारवाई करा : शाहीस्ता खान पठाण

चंद्रपूर : येथील बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ( बीआईटी ) येथे मागील सहा वर्षांपासून माईंनीग विभागाचे प्रमुखपदी कार्यरत आहेत. याच संस्थे मधील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य तसेच पॉलटेकनिक कॉलेजचे प्राचार्य मागील अनेक दिवसांपासून महिला प्राध्यापकाला मानसिकरीत्या प्रताडीत करीत होते.

06 ऑक्टोबर रोजी महिला प्राध्यापक आपल्या केबिन मध्ये असतांना दोघा प्राचार्यांनी केबिन मध्ये येवून छेडछाड करण्यास सुरुवात केली. त्यांचा वाईट हेतू लक्षात येताच महिला प्राध्यापकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता तिचे हात पकडून ओढाताण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिच्या हातावर नखांचे व्रण उमटले सदर प्रकारची पीडित महिलेने संस्था चालक व पोलिसांना तक्रार दिली मात्र तक्रारींवर कुठलीच कारवाई न करता संस्था चालकांना पोलीस स्टेशनला बोलवून प्रकरण रफा – दफा करण्यात आले.
उलट महिला प्राध्यापका कडून जबरीने पत्र लिहून तिच्यावर सतत पाळत ठेवण्यात येत होते.

सदर घटनेची माहिती हुमन वेलफेअर मल्टीपर्पज संस्थेचे अध्यक्षा शाहीस्ता खान पठाण यांना मिळताच त्यांनी पीडितेची भेट घेऊन तिला हिम्मत दिली व चंद्रपूर येथे पत्रपरिषद घेऊन प्राध्यापकावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले पत्रकार परिषदेत मंगला गाईकवाड, अनिता वनकर, वनमाला टिकले, सोहेल शेख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.