निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला ओबीसींचा पुळका – ना. छगन भुजबळ

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  होते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

चंद्रपूर : निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला ओबीसींचा पुळका येत आहे.आधी ओबीसींना झोपविण्याचे काम केले. आता जनजागरण करीत आहेत. त्यांना ओबीसींबद्दल कळवळा असेल तर दिल्लीत जावून जन जागरण करावे आणि सर्व डाटा घेवून यावा. प्रधानमंत्र्यांनी ओबीसींसाठी आता पावले उचलण्याची गरज असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भूजबळ यांनी व्यक्त केले.

मूल येथील मा सा कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पूर्व विभागाच्या वतीने आज सोमवारी (१८ आॅक्टोबर २१) ला आयोजित अभिनंदन सोहळा व कार्यकर्ता मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ महाडोळे हे होते. एक तासाच्या शेरो शायरी भाषणात त्यांनी, भाजपाची चांगलीच खिल्ली उडविली. घटनात्मक आरक्षण ओबीसींना मिळालेच पाहिजे.

त्यासाठी सर्व ओबीसी बांधवानी घट्ट मूठ निर्माण केली पाहिजे. महा विकास आघाडी सरकार पाडण्याचे काम भाजप करीत आहेत. वेगवेगळ्या चौकशी बसवत आहेत. भाजप सरकार बुडवू शकणार नाही आणि विझवू शकणार नाही. यावेळी त्यांनी फडणवीसांना आव्हान केले, हे तुमचे कारनामे महाराष्टातील जनतेला आवडेल काय? झारीतील शुक्राचार्य त्रास देण्याचे काम करीत असल्याचे ना.भूजबळ म्हणाले.