मूर्ती येथील ग्रीनफिल्ड विमानतळाचे काम पूर्णत्वास न्यावे

शेतकऱ्यांची मागणी;आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन

चंद्रपूर : 2018 मध्ये राजुरा तालुक्यात मूर्ती येथे ग्रीनफिल्ड विमानतळ निर्मिती करण्याबाबत प्रकल्पास सुरुवात करण्यात आली. यासाठी माजी आमदार एडवोकेट संजय धोटे यांनी याबाबत पाठपुरावा केला. प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यासाठी जवळपास 46 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. मात्र राज्यात सत्ता बदलल्यानंतर मूर्ती येथील ग्रीनफिल्ड विमानळाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मूर्ती व परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार निवेदन देऊन विनंती करण्यात आले.

यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार
एडवोकेट संजय धोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव उपस्थित होते. चूनाळा विहीर गाव जिल्हा परिषद क्षेत्रात कुठलाही उद्योग नसल्यामुळे युवक वर्ग बेरोजगार आहे. मूर्ती येथील विमानतळ प्रकल्प पूर्णत्वास आल्यास तालुक्यातील व जिल्ह्याचा विकासाला चालना मिळेल. स्थानिक शेतकऱ्यांना व युवकांना रोजगार उपलब्ध होईल. या भागात नैसर्गिक साधन संपदा विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योजक येतील. कापूस उत्पादक क्षेत्र असल्यामुळे मोठी गुंतवणूक होईल. ताडोबा सारखे जागतिक कीर्तीचे व्याघ्र प्रकल्प या जिल्ह्यात असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोटॅनिकल गार्डन विसापूर येथे होत असल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. सर्वाधिक महसूल देणारा हा जिल्हा असल्यामुळे विकासाच्या दृष्टीने विमानतळाची नितांत आवश्यकता आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने साहित्याची निर्मिती जिल्ह्यात होत असल्यामुळे विमानतळाची निकड लक्षात घेऊन माजी पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मूर्ती येथे ग्रीनफिल्ड विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली. प्रकल्पाला गती ही मिळाली 46 कोटी जवळपास या प्रकल्पासाठी खर्च करण्यात आले मात्र निवडणुकीनंतर राज्यात सरकार बदलले आणि प्रकल्प मागे पडलेला आहे त्यामुळे या भागातील शेतकरी व युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

या प्रकल्पासाठी सर्वतोपरी शेतकरी सहकार्य करायला तयार आहेत. कॉरिडॉरच मुद्दा उपस्थित करून या प्रकल्पात अडथळे निर्माण करण्याचा जनिवपूर्ण प्रयत्न केल्या जात आहे. असा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केलेला आहे. अश्याप्रकाचे विकासाला खीळ बसविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांचे मनसुबे या भागातील जनता आंदोलन करून हाणून पाडल्याशिवाय रहाणार नाही. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण व भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या चमूने सर्वेक्षण करूनच विमानतळासाठी योग्य असल्याचा अहवाल दिलेला आहे. या भागाच्या विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी मूर्ती ग्रीन फील्ड विमानतळाचे काम शीघ्र गतीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष, माजी अर्थ मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना राजुरा येथील दौऱ्यात मूर्ती भागातील शेतकरी पुत्रांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळात माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, मूर्ती चे माजी उपसरपंच किसनराव मुसळे, गुलाब मंदे, दादाजी गिरसावळे, सुरेंद्र साळवे, विहिरगाव ग्रा. पं. सदस्य गणेश वांढरे, चुनाळा चे सरपंच बाळू वडस्कर, माजी सरपंच संजय पावडे, भाजप जिल्हा सचिव तथा खमोना सरपंच हरिदास झाडे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पिंगे, साखरी ग्रामपंचायतचे उपसरपंच भाऊराव बोबडे, नितीन बांब्रटकर मूर्ती येथील प्रकल्पग्रस्त सुरेंद्र साळवे यांची उपस्थिती होती.