‘All Soul’s Day’ निमित्त काँग्रेस तर्फे कब्रस्थान स्वच्छता कार्यक्रम

घुग्घुस : ईसाई धर्माच्या मान्यतेनुसार समाजातील मृतकांना दफन केल्या जाते व दफनभूमीवर समाधीचे निर्माण केल्या जाते.

प्रतिवर्षी 02 नोव्हेंबर रोजी सांयकाळी ख्रिस्ती समाजबांधव आपल्या मृत परिजनांच्या समाधीवर जाऊन फुल व कॅडल पेटवून मृतकाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करतात व या दिवसाला ‘All Soul’s Day’ म्हणून साजरा करतात.

या दिवसाचा महत्व समजून घुग्घुस शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजूरेड्डी यांच्यातर्फे शिवनगर येथील कब्रस्थान मध्ये ग्रास कटिंग मशीनच्या साहाय्याने सफाई अभियान राबविण्यात आले.