Petrol-Diesel, Gas दरवाढी विरोधातील आंदोलनाचे ते बॅनर व्हायरल

चंद्रपूर : सध्या देशात इंधन दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचे कबंरडे मोडले आहे. पेट्रोल – डिजल व स्वयंपाक गॅस खरेदी करणे सर्व सामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर झालेले आहे. देशातील विरोधी पक्ष आपापल्या पक्षाच्या कुवतीनुसार दरवाढी विरोधात आंदोलन करीत आहे.

मात्र“बहोत हुई पेट्रोल – डिजल के महंगाई की मार अबकी मार मोदी सरकार” असा जयघोष करणाऱ्या व यूपीए – 2 च्या वेळेस पिपली लाईव्ह चित्रपटातील सखी सैय्या बहोत ही कामात है, महंगाई डायन खाई जात है, या गीतावर रस्त्या – रस्त्यात आक्रोश मांडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या तोंडावर सध्या कुलूप लागलेले आहेत.

अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील सोशल मीडियावर एक पोस्ट अत्यंत वेगाने व्हायरल होत आहे. डिजल गॅस दरवाढीच्या निषेधार्थ तसेच FDI ला दिलेल्या परवानगी विरोधात भारतीय जनता पार्टीने काँग्रेस – राष्ट्रवादी शासना विरोधात 20 सप्टेंबर 2012 रोजी चंद्रपूर बंदची हाक दिली होती.

त्या आंदोलनाचे बॅनर व्हायरल होत असून आता महंगाई विरोधात भाजप कार्यकर्ते कधी मैदानात उतरणार असा खोचक प्रश्न केल्या जात आहे. सोशल मीडियाचे जग हे अविस्मरणीय हे कधीच काही विसरू देत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.